बेळगाव कोर्टाचे संजय राऊतांना समन्स
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बेळगावात 30 मार्च 2018 रोजी केलेल्या प्रक्षोभक भाषण प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहे. 1 डिसेंबरला न्यायालयात हजार राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहे.Belgaum court summons Sanjay Raut
बेळगाव कोर्टाने पाठवलेलं समन्स आणि त्यावेळी केलेल्या भाषणावर संजय राऊत म्हणाले आहेत की, सीमाभागातील बांधांवर कर्नाटक सरकारने हल्ले केले किंवा कायद्याचा बडगा दाखवून त्यांना तुरुंगात टाकलं, तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील. यामध्ये प्रक्षोभक काय आहे? हे मला कळलं नाही, असं ते म्हणाले आहेत. ते म्हणाले, 2018 मध्ये केलेल्या भाषणाची दखल घेऊन मला त्यांनी आता कोर्टात हजर राहण्यास सांगितलं आहे. याचा अर्थ मी तिथे कोर्टात जावं आणि कोर्टात गेल्यावर माझ्यावर हल्ला व्हावा, अशी माझ्याकडे माहिती असल्याचं ते म्हणाले आहेत.
ML/KA/PGB
28 Nov .2022