अफजखानाच्या कबरीबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात निकाली

 अफजखानाच्या कबरीबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात निकाली

दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलानच्या कबरी बाहेरचे अनधिकृत बांधकाम उध्वस्त करण्याच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.The petition regarding Afzkhana’s grave was settled in the Supreme Court

या महिन्यात अफझल खानच्या कबरी लगत केलेले १९ खोल्यांचे बांधकाम आणि इतर अतिक्रमण राज्य सरकारच्या वन विभाग आणि महसूल विभागाने कडेकोट बंदोबस्तात उध्वस्त केले होते. यामुळे कबरी ला धोका होऊन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या यापूर्वीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याची तक्रार याचिकेत करण्यात आली होती.

राज्य सरकारने प्रतिज्ञा पत्राद्वारे खानाच्या कबरीचे कोणतेही नुकसान झाले नसून तिला हात लावण्यात आलेला नाही, केवळ अतिक्रमित बांधकाम पाडल्याचे स्पष्ट केल्याने सरकारचे म्हणणे ग्राह्य धरत ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली.

ML/KA/PGB
28 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *