कर्नाटक सरकार अन्य राज्यातील ‘कन्नड’ माध्यमाच्या शाळा सुधारण्याकडेही लक्ष देणार

 कर्नाटक सरकार अन्य राज्यातील ‘कन्नड’ माध्यमाच्या शाळा सुधारण्याकडेही लक्ष देणार

बंगळुरू,दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दाक्षिणात्य राज्ये आपली भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी नेहमीच जागृत असल्याचे आपण पाहतो. याचा अजून एक प्रत्यय आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या घोषणेतून आला आहे. अन्य राज्यातील आणि कर्नाटकसीमावर्ती भागातील कन्नड माध्यमाच्या शाळांच्या गुणवत्तांत्मक सुधारणांसाठी सरकार विशेषत्वाने प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी आज जाहीर केले.

कन्नड भाषा ही राज्यातील नागरीकांची ओळख आहे. तिचे रक्षण आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे, अस म्हणत मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकसाठी  God’s Living Country अशी नवीन टॅग लाईन घोषित केली आहे. नुकतीच त्यांनी महाराष्ट्रातील कन्नड माध्यमाच्या शाळांना विशेष अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.

महाराष्ट्रात मोठ्या संख्येने राहत असलेल्या कन्नड व्यक्तींच्या हितसंबंधांचे रक्षण करणे ही कर्नाटक सरकारची जबाबदारी आहे, असे ही महत्तपूर्ण विधान त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले.

या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीतील मराठी माध्यमाच्या बऱ्याचशा शाळांची दयनीय स्थिती, भाषेवरून राजकारण करणाऱ्या नेत्यांचे शालेय शिक्षणातील मराठी माध्यमाकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष आणि सीमावर्ती भागातील मराठी शाळांची उपेक्षा याबाबींवर गांभीर्यांने उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी भाषाप्रेमी आणि शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

SL/KA/SL

27 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *