कामाख्या देवी जागृत आहे, विरोधकांनी जपून बोलावं – मुख्यमंत्री
गुवाहाटी,दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आसाममधील गुवाहाटी येथे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. ते मुख्यमंत्रीपदावर येण्याआधी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यात त्यांच्या आसाम वारीने महत्त्वाची भूमीका बजावली होती. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर टिकेची झोड उठवली आहे. कामाख्या देवीली रेड्यांचा बळी देतात. हे आमदार गुवाहाटी कशाला चाललेत? अशी खोचक टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती.
मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटी विमानतळावर पाऊल ठेवताच विरोधकांचा समाचार घेतला आहे. आम्ही देवीचे भक्त आहोत. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलो आहोत. कामाख्या देवी कडक आणि जागृत आहे. याची परिचिती सर्वांना आलीच असेत्. त्यामुळे विरोधकांनी जपून बोलावं, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं नाव न घेता लगावला. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. त्यांच्या निमंत्रणामुळेच आम्ही गुवाहाटीला आल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं. Kamakhya Devi is awake, opposition should speak carefully CM Shinde