सोलापूरच्या जलतरणपटू कीर्तीचा जागतिक विक्रम

 सोलापूरच्या जलतरणपटू कीर्तीचा जागतिक विक्रम

मुंबई,दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापूरची 16 वर्षीय जलतरणपटू कीर्ती नंदकिशोर भराडीया हिने काल अरबी समुद्रात सलग ७ तास २२ मिनिटे पोहून ३८ किमी अंतर कापत विश्वविक्रम केला आहे. वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडीया दरम्यानचे अंतर तिने दुपारी 12 ते सायंकाळी ७.२२ या कालावधीत पोहून तिने ही कामगिरी फत्ते केली आहे.

सोलापूर येथील मार्कंडेय जलतरण तलावात कीर्ती गेल्या सात-आठ महिन्यांपासून दररोज सात-आठ तास पोहण्याचा सराव करत होती. तर गेल्या दिड महिन्यापासून ती मुंबई येथे समुद्रात पोहण्याचा सराव करत होती. काल अखेर तिच्या या परिश्रमाला फळ मिळालं आहे. काल सायंकाळी ७.२२ ला कीर्ती  गेट वे ऑफ इंडिया जवळ येताच तिचे कुटूंबिय, मित्र मंडळी आणि प्रशिक्षकांनी एकच जल्लाेष केला.

या विक्रमाची तपासणी करण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.कीर्ती सोलापूर येथील प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. या विक्रमासाठी तिला स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर सहकार्य लाभले.

26 Nov. 2022

SL/KA/SL

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *