राज्याला नवीन राज्यपाल मिळण्याची शक्यता
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर कोशीयारी यांच्या जागी पुढील काही दिवसात नवीन राज्यपाल येण्याची शक्यता आहे, कोशियारी यांना दिल्लीत बोलावण्यात आले असून ते पुढील दोन दिवसात केंद्रातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.State likely to get new governor
सध्या राज्यपाल भगतसिंग कोशियारी चर्चेत असून यापूर्वीही त्यांच्या अनेक निर्णय आणि वक्तव्यांनी ते सतत चर्चेत राहिले आहेत. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बद्दल ची एक याचिका उच्च न्यायालयात दाखल असतानाच आता शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरून आणखी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
दीपक जगदेव यांनी ॲड नीतीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली असून त्यात या वक्तव्याबद्दल राज्यपालांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे.
याच दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना दिल्लीत बोलावण्यात आले असून ते येत्या २४ किंवा २५ तारखेला दिल्लीत जाणार आहेत.
ML/KA/PGB
22 Nov .2022