आता पदवीसाठी चार वर्षे
नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्वविद्यालय अनुदान आयोगाने (University Grant Commission) 12 नंतरच्या पदवी शिक्षणामध्ये एका वर्षाची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे संपूर्ण देशभर 12१ नंतर बी.ए., बी.कॉम. आणि बीएमसी सह अन्य आधी तीन वर्षांचे असणारे पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचे होणार आहेत. शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून, सर्व विद्यापीठांचे नवीन विद्यार्थी ४ वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये (BA, B.Com, B.Sc.) इ. प्रवेश घेऊ शकतील.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या म्हणण्यानुसार, सर्व विद्यार्थ्यांसाठी ४ वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल. असे असले तरीही या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांना केली जाणार नाही. विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास ते आधीपासून सुरू असलेले ३ वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू ठेवू शकतात.
यूजीसी च्या या निर्णयावर अनेक शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. ४ वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांवर एक वर्षाचा आर्थिक बोजा वाढणार असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. तर ही तरतूद म्हणजे शिक्षण संस्थांना पैसै कमावण्यासाठी अजून एक वर्ष देणे आहे असा सूर पालक वर्गामध्ये उमटत आहे.
SL/KA/SL
22 Nov. 2022