गुजरात विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात सुट्टी

 गुजरात विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात सुट्टी

मुंबई,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरिने विचार करून उपायजोजना केल्या जातात. 1 आणि 5 डिसेंबर 2022 रोजी गुजरात विधानसभेच्या सार्वत्रित निवडणूका घेण्यात येत आहेत. यासाठी गुजरातच्या सीमेवर महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, नंदूरबार आणि धुळे या जिल्ह्यांतील मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या जिल्ह्यांमधील ज्या मतदारांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा सर्व मतदारांसाठी शासकीय आदेशानुसार ही सुट्टीची सवलत देण्यात येणार आहे.
मतदानाचा हक्क योग्यरित्या बजावता यावा यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये तसेच औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांतील मतदारांना भर पगारी सुट्टी देण्यात यावी असे महाराष्ट्र शासनाच्या शासकीय आदेशात नमुद करण्यात आले आहे. तसेच ज्या आस्थापनांना सुट्टी देणे शक्य नसेल त्यांनी किमान दोन तासाची सवलत द्यावी, मात्र तशी परवानगी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून घ्यावी असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मागील काही निवडणूकांमध्ये संस्था/आस्थापना इ. कडून भरपगारी सुट्टी किंवा सवलत मिळत नसल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे या निवडणूकी दरम्यान ही विशेष तरतूद करण्यात आली आहे.

SL/KA/SL
22 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *