विदर्भातील पहिली आणि राज्यातील दुसरी तृतीयपंथी वकील

 विदर्भातील पहिली आणि राज्यातील दुसरी तृतीयपंथी वकील

वर्धा दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजाच्या सांस्कृतिक, आर्थिक, पारंपरिक मर्यादेत अनेक घटकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. या वंचितांमधील एक प्रचंड दुर्लक्षित घटक म्हणजे तृतीयपंथी. त्यांना विविध गोष्टीचा सामना करावा लागतो, त्यांना समाजात हिणवले जाते, त्यामुळेच त्यांना शिक्षणापासूनही वंचित राहावं लागतं.

पण याला अपवाद ठरली ती म्हणजे वर्धा जिल्ह्याच्या राम नगर इथली वकील बनलेली शिवानी सुरकार उर्फ विजय, हिचा जन्म हा विजया दशमीला झाल्याने तिचे नाव विजय असे ठेवले, शिवानीने सांगितले की माझा जन्म जरी मुलाच्या योनीन झाला असला तरी मला मुली प्रमाणे राहायला आवडायचं ज्याप्रमाणे मुली तयार होतात तस मला तयार व्हायला आवडायचं. 1st in Vidarbha and 2nd eunuch Advocate in the State- Shivani/Vijay Surkar

जसे जसे माझे वय वाढत गेले तसे तसे वयाच्या १८ ते २० व्या वर्षी विजय उर्फ शिवानी हिला कळले की ती एक तृतीपंथी आहे. त्या नंतर ती रेल्वेत, पेट्रोल पंप, टोल नाक्यावर तीने पैसे सुद्धा मागितले, आणि आजही काम पडलं की ती मागते तो एक हक्क आहे. लोक भीक म्हणून देतात पण आम्ही शगुन म्हणून मागतो.

ती तृतीयपंथी आहे असे कळल्यानंतर तिला सर्वात जास्त धीर आणि आधार दिला असेल तर ते म्हणजे शिवानीचे वडील संतोष सुरकार यांनी. शिवानीने बोलतांना सांगितले की माझ्या वडिलांनी मला शिक्षणाशिवाय पर्याय नाही तुला समाजात जगायचे असेल तर तुला खूप खुप शिकावं लागेल त्यांचे ऐकून शिवानीने स्वतःला शिक्षणाच्या प्रवाहात झोकून घेतले आणि वर्धेतूनच तिने बी. कॉम. च शिक्षण पूर्ण केले.

नंतर सेवाग्राम इथून एमबीए केले, दिल्ली विद्यापीठाचा एनडीडी हा नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रमही तिने पूर्ण केला आहे. त्यानंतर तिने यशवंत महाविद्यालयातून एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं केले. ती देशात तिसरी, राज्यात दुसरी तर विदर्भात पहिली तृतीयपंथी वकील आहे. तीन ते चार पदव्या असलेली तृतीय पंथातील आपण पहिलेच असल्याचा दावाही शिवामीने केला.

त्यानंतर महिंद्रा आणि श्रीराम फायनान्स या कंपन्यांमध्ये काही दिवस नोकरी केली. परंतु एका मुलाच्या वेशात जाणे पसंत न पडल्याने व तिला काही अपमानजनक गोष्टीचा सामना करावा लागल्याने तिने नोकरी सोडली आणि थेट मुंबई गाठली. काही दिवस मुंबई राहिल्या नंतर पुन्हा ती वर्ध्यात परत आली.

कोरोना काळात शिवानी वर्धेला आली. त्यानंतर मात्र आता वर्धेतच आमच्या तृतीयपंथीमध्ये जनजागृती करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे काही लोक भीक म्हणून बघतात. आम्ही मात्र त्याला शगुन समजतो.

आमच्यातील लोकांनाही स्वाभीमानाने जगता यावे यासाठी आपल्याला तृतीयपंथांचा नेता व्हायचे आहे. त्यासाठी आपण राजकारणातही प्रवेश केला आहे. आपण आपल्या शिक्षणाचा वकिलीचा उपयोग करून तृतीयपंथी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू तसेच सामाजिक कार्यासाठी काम करणार असल्याचं शिवाणी सुरकार हिने सांगितले.

तृतीयपंथी समुदायातील लोकांना अनेकवेळा अडचणींचा, अपमानाचा सामना करावा लागतो. चांगली नोकरी न मिळणे, घर भाड्याने किंवा विकत न घेता येणे, समाजामध्ये आदरपूर्वक वागणूक न मिळणे, अर्थातच सर्वांप्रमाणे या समुदायातील व्यक्तींना देखील सन्मानाने जगण्याचा हक्क आहे.

त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यातील गुणांना वाव देणे, त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. बदललेल्या काळानुसार अनेक तृतीयपंथी यशस्वी होत जगापुढे एक आदर्श उभा करत आहेत. तसेच तृतीयपंथी समुदायातील इतरांनी देखील शिवानी सुरकार या उच्च शिक्षित तृतीयपंथीचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण शिकावे अशी अपेक्षा आहे.

ML/KA/SL

22 Nov 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *