आशिया चषक टेबल टेनिस स्पर्धेत मनिका बत्राची दिमाखदार कामगिरी

 आशिया चषक टेबल टेनिस स्पर्धेत मनिका बत्राची दिमाखदार कामगिरी

बँकॉक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्रा ही १.६३ कोटी रुपयांच्या बक्षीस रक्कम असलेल्या आशिया कप स्पर्धेत अंतिम चारमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिला उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या चौथ्या मानांकित मीमा इतोने पराभूत केले.

मनिका बत्राने (Manika batra) आशिया कप टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. तिने कांस्यपदकाच्या लढतीत हिना हयाताचा ४-२ असा पराभव केला. हिना हयाताचे रँकिंग सहावे आहे. तिने तीनदा ही स्पर्धा जिंकली आहे. या दिग्गज खेळाडूला हरवून मनिकाने देशाचे नाव उंचावले आहे. (manika batra made history by becoming the first indian woman to win a bronze medal)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मनिकाच्या या कामगिरीची दखल घेऊन अभिनंदन केले आहे.
ML/KA/SL
20 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *