संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून

 संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून

नवी दिल्ली, दि. 19 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी  ट्विट करून ही माहिती दिली आहे. Winter Session of Parliament from 7th Dec.

त्यांनी सांगितले की, आगामी हिवाळी अधिवेशन 23 दिवसांचे असून त्यात 17 बैठका होणार आहेत. अमृत कालमध्ये अधिवेशनादरम्यान विधिमंडळाचे कामकाज आणि इतर विषयांवर चर्चा होणार आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशात निवडणुकीची धामधूम सुरू असताना हे अधिवेशन सुरू होणार आहे.

कोरोनाची परिस्थिती पाहता आणि लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयातील बहुतांश सदस्य आणि कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले असल्याने अधिवेशन कोणत्याही निर्बंधाशिवाय पार पडण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या वर्षांत कोविडमुळे संसदेच्या अधिवेशनावर परिणाम झाला.

दरम्यान खासदार राहुल गांधी हे भारत- जोडो यात्रेत व्यस्त असल्यामुळे अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाहीत. अशी माहिती समोर येत आहे.

SL/KA/SL

19 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *