सावरकरांबद्दल काँग्रेस, शिवसेनेची मते वेगळी; ‘मविआ’वर परिणाम नाही!

 सावरकरांबद्दल काँग्रेस, शिवसेनेची मते वेगळी; ‘मविआ’वर परिणाम नाही!

शेगाव, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने मोठे प्रतिसाद व प्रेम दिलेले आहे हे काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुल गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटांशासमोर झुकले नाहीत हे सांगताना त्याची तुलना सावरकरांशी केली.

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.Congress, Shiv Sena have different opinions about Savarkar; No effect on ‘Mawia’!

शेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले की, सावरकारांच्या मुद्दयावरून महाराष्ट्रातील काही पक्ष व संघटना नाहक वातावरण तापवत आहेत. सावरकरांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे ते कसे नाकारता? असा सवाल उपस्थित करून भारत जोड़ो यात्रेचा हा एकच मुद्दा नाही. यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे.

काँग्रेसने इतिहासाची मोडतोड करुन मांडणी केलेली नाही. द्विराष्ट्रवादाचा सिंद्धात सावरकर यांनीच मांडला.१९४२ च्या भारत छोडो, चले जावच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होते हे ऐतिहासिक सत्य आहे.

भारत जोडो यात्रेला प्रचंड समर्थन मिळत असल्याने काही लोक विरोध करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेची सर्व भारतयात्रींना चिंता आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेत कसलीही तडजोड केली जाणार नाही.

भारत जोडो यात्रेत उद्या १९ तारखेला नारीशक्तीचा स्व. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त उद्या भारत जोडो यात्रेत ९० टक्के महिलांचा सहभाग असेल. महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्याचा निर्णय इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी घेतला यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देशभर महिलांचे प्रतिनिधित्व वाढलेले आहे. उद्या नारीशक्तीची भव्य दर्शन भारत जोडो यात्रेत दिसेल असे जयराम रमेश यांनी सांगितले.

ML/KA/PGB
18 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *