अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या मराठी पुस्तकांचे प्रकाशन

 अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या मराठी पुस्तकांचे प्रकाशन

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारकडून सध्या प्रादेशिक भाषांमधुन उच्चशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी देशभर विविध प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांच्या हस्ते  मुंबईत एआयसीटीईच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन All India Council for Technical Education (AICTE) करण्यात आले.

नवी दिल्लीचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज या मराठी भाषेत निर्मित अभियांत्रिकी पुस्तकांचे वितरण देखील करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने  पुस्तकांच्या भाषांतराचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे याप्रसंगी विद्यापीठाचे प्र कुलगुरू, समन्वयक, भाषांतरकार, अशा सर्वांचा  सत्कार करण्यात आला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार म्हणाले.

“राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रादेशिक भाषांना दिलेले प्राधान्य, सरकारची सर्व प्रादेशिक भाषांमधील कटिबद्धता व्यक्त करणारे आहे. प्रादेशिक भारतीय भाषांमधील शिक्षण, विद्यार्थ्यांना तांत्रिक विषय समजून त्यात संशोधन करण्यास सुलभता आणणारे ठरेल- “

विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मदतीने, जून 2023 पर्यंत, महाराष्ट्रातील सर्व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमातील पुस्तके मराठी भाषेत अनुवादित करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट असल्याचे  यावेळी महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील स्पष्ट केले.

SL/KA/SL

15 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *