निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठींना मोठा दिलासा .

 निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठींना मोठा दिलासा .

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अंगडियाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या वादग्रस्त निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना उच्च न्यायालयाकडून 25 हजाराचा अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.Big relief to suspended DCP Saurabh Tripathi. गेल्या आठ महिन्यापासून फरारी असलेल्यानिलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी पहिल्यांदा मार्च महिन्यात अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्रिपाठी यांची या प्रकरणातील एकूण वागणूक ही ‘कुंपणच जेव्हा शेत खाते’, या मराठी म्हणीची आठवण करून देणारी असल्याची टिप्पणी करून सत्र न्यायालयाने त्यांचा पहिला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. काही दिवसांपूर्वी फरारी असलेल्या त्रिपाठी यांनी पुन्हा एकदा सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनाची मागणी केली. परंतु गुन्ह्यात त्रिपाठी यांचा सकृतदर्शनी सहभाग दिसत असल्याचे नमूद करून हा यावेळीही सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा नाकारला होता. या निर्णयाच्या विरोधात त्रिपाठी यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने कुठल्याही अटी-शर्थी न घालता सौरभ त्रिपाठी यांना 25 हजाराचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

ML/KA/PGB
15 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *