स्वतःची द्राक्षबाग शेतकऱ्याने केली जमीनदोस्त
सांगली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तोट्यात चाललेल्या द्राक्षबागेमुळे हताश झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने आपली एक एकरवरील द्राक्षबाग कुऱ्हाडीने तोडून जमीनदोस्त केली आहे.
तासगाव तालुक्यातल्या आरेवाडी या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. शशिकांत पवार या शेतकऱ्याला गेल्या काही वर्षांपासून पडणारा अवकाळी पाऊस,गारपीट आणि रोगांचा प्रादुर्भाव याचा मोठा फटका बसला होता, द्राक्षबागेसाठी पवार यांनी मोठ्या प्रमाणात सोसायटीचे कर्ज घेतले होते.Farmers destroyed their own vineyards
मात्र निसर्गाच्या लहरीपणा आणि रोगांचा प्रादुर्भावामुळे द्राक्षबागेचे उत्पन्न मिळणे अशक्य बनले होते,त्यामुळे हताश झालेल्या पवार यांनी स्वतःच आपल्या हाताने कुऱ्हाडीने घाव घालून उभी द्राक्ष बाग शेती Vineyard farming तोडून टाकत जमीनदोस्त केली.
ML/KA/PGB
14 Nov .2022