आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय महिलांची सोनेरी कामगिरी

 आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय महिलांची सोनेरी कामगिरी

अम्मान जॉर्डन, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आयोजित आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय महिलांनी चार सुवर्णपदके जिंकून दिमाखदार कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या लवलिना बोरगोहेन (७५ किलो), परवीन हुडा (६३ किलो), स्विटी (८१ किलो) आणि अल्फिया पठाण (८१ किलोपेक्षा अधिक) या चौघींनी चमकदार कामगिरीसह विजेतेपद मिळविले. मीनाक्षी (५२ किलो) रौप्यपदकाची मानकरी ठरली. Indian Women’s Golden Performance in Asian Boxing Championships

आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या इतिहासात ही भारताची तिसरी सर्वोत्तम कामगिरी कामगिरी ठरली आहे. याआधी २००५मध्ये सात सुवर्णपदके तर २००३मध्ये पाच सुवर्णपदके नावावर केली आहेत.

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लोव्हलिनाने आशियाई चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेती उझबेकिस्तानच्या रुझमेटोवा सोखिबावर वर्चस्व राखले आणि ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत ५-० असा विजय मिळवला. तर परवीन हुडाने जपानच्या किटो माईविरुद्ध ५-० असा विजय मिळवला.

वर्ल्ड चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेती स्वीटीने कझाकिस्तानच्या गुलसाया येरझान ५-० ने मात केली. ८१ किलोपेक्षा अधिक वजनी गटात अल्फिया पठाणच्या विरुद्ध खेळणाऱ्या इस्लाम हुसैलीला पंचांनी अपात्र ठरवल्यानंतर महिला विभागात भारताला चौथे सुवर्णपदक मिळवून दिले.

SL/KA/SL

12 Nov. 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *