बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी
मुंबई दि.12( एम एमसी न्यूज नेटवर्क): गोरेगाव पूर्व भागात असलेल्या आरे कॉलनी परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याने एका महिलेवर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.संगीता गुरव असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. संगीता गुरव या आरे कॉलनीतील आदर्श नगर परिसरात राहतात.
शुक्रवारी संध्याकाळी त्या घरी असताना बिबट्याने घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये संगीता गुरव यांच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. सध्या गुरव यांच्यावर जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
याआधी दिवाळीच्या दिवशी आरे कॉलनी 15 नंबर युनिटमध्ये बिबट्याने एक दीड वर्षाची मुलीवर हल्ला केला होता, त्यामध्ये चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
SW/KA/SL
12 Nov. 2022