हळदीची उलाढाल वाढली
सांगली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सांगली मार्केट यार्डात राजापुरी आणि परपेठ हळदीची उलाढाल 192 कोटी रुपयांनी वाढली. गेल्या वर्षभरात 1899 कोटी 47 लाख 67 हजार रुपयांची खरेदी विक्री झाली. Turmeric turnover increased अतिवृष्टी,अवकाळी पाऊस यामुळे हळद उत्पादन घटेल, असे वाटत असतानाच हळदीची उलाढाल वाढली आहे. While this is the case, turmeric turnover has increased.
सांगली मार्केट यार्डातील हळदीच्या सौद्यासाठी देशभरातील व्यापारी येतात. कोरोनामुळे हळदीची मागणी वाढली होती.पण 2021-22 यावर्षात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. तरीही हळदी ची उलाढाल वाढली.1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या आर्थिक वर्षात राजापुरी हळदीची 16 लाख 20 हजार 120 क्विंटल आवक झाली. या वर्षात 1603 कोटी 91 लाख 97 हजार 900 रुपयांची उलाढाल झाली. तर परपेठ हळदीची 1 लाख 16 हजार 217 क्विंटल आवक झाली. त्यात एकूण 103 कोटी 20 लाख 6 हजार 960 रुपयांची उलाढाल झाली. The total turnover was 103 crore 20 lakh 6 thousand 960 rupees.
यावर्षात राजापुरी हळदीची 19 लाख 13 हजार 435 क्विंटलआवक झाली. त्यात 1709 कोटी 65 लाख 41 हजार 725 रुपयांची उलाढाल झाली.राजापुरी हळदीची आवक 2 लाख 93 हजार 314 क्विंटलने वाढली. त्यामुळे 105 कोटी 73 लाख 43 हजार 825 रुपयांनी उलाढाल वाढल्याचे दिसत आहे. परपेठ हळदीची आवक 1 कोटी 80 लाख 938 क्विंटल वाढली. त्यामुळे 86 कोटी 62 लाख 19 हजार 180 रुपयांनी खरेदी-विक्री वाढली. सांगली बाजारातील हळदीच्या उलाढालीमुळे तज्ञांचे अंदाज चुकीचे ठरले आहेत.Turmeric turnover increased
ML/KA/PGB
11 Apr 2022