भांडवली बाजाराची नवीन आर्थिक वर्षाची (FY23) शानदार सुरुवात

 भांडवली बाजाराची नवीन आर्थिक वर्षाची (FY23) शानदार सुरुवात

मुबंई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत    गेल्या आठवड्यात २१-२२ हे आर्थिक वर्ष संपून २०२२-२३ नवे आर्थिक वर्ष सुरु झाले. गुरुवारी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बाजार लाल चिन्हात बंद झाला. २०२१-२२ हे आर्थिक वर्ष भारतीय बाजारपेठेसाठी घडामोडींनी भरलेले वर्ष ठरले.या वर्षी भारतीय बाजारपेठेने अभूतपूर्व रॅली पाहिली आणि ऑक्टोबरमध्ये विक्रमी उच्चांक गाठला. परंतु त्यानंतर यूएस फेडचा कठोर दृष्टीकोन, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे (geopolitical tensions) वातावरण बदलले आणि तेव्हापासून बाजार घसरण्यास सुरुवात झाली. भारतीय बाजारात प्रचंड अस्थिरता होती. जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केले. या दिवशी, भारतीय बाजारात २०२२ मधील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण झाली. परंतु निफ्टीचे प्रदर्शन या आर्थिक वर्षात जगातील इतर देशांच्या तुलनेने चांगले राहिले. निफ्टीने १९ टक्के परतावा दिला.

२०२२-२३ ह्या वर्षाची सुरुवात अत्यंत आश्वासक झाली.१ एप्रिल रोजी बँक, पॉवर, ऑइल अँड गॅस आणि रियल्टी समभागांच्या मजबूत कामगिरीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद होण्यात यशस्वी झाले. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या चर्चेतील प्रगतीच्या संकेतांनी बाजाराला पाठिंबा दिला, त्याप्रमाणे कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण व मार्च महिन्यातील GST संकलनाचा विक्रमी उच्चांक(GST collections at record high of Rs 1.42 lakh crore in March)सलग ९ व्या महिन्यात १ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला, यामुळे सेन्सेक्स ८०० अंकांनी वधारला.

गेल्या आठवड्यात FII कडून खरेदी झाल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला.
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष बुधवारपासून सुरु होणाऱ्या RBI monetary policy च्या बैठकी कडे राहील. रशियाचे cpi आकडे, Hong Kong चे PMI आकडे.तसेच ८ एप्रिल रोजी RBI च्या व्याजदरासंबंधी जाहीर होणाऱ्या निर्णयाकडे असेल. सोमवारी चीनचे व मंगळवारी चीन/ हॉंगकॉंग मार्केट बंद राहतील.
मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीने १७,५०० चा स्तर तोडला व १७,७०० पर्यंत मजल मारली..मार्केट Overbought असल्याने गुंतवणूकदारानी सावधानता बाळगावी.

खालच्या स्तरावरून बाजराची उसळी. Market bounces back to end near day’s high
आठवड्याची सुरुवात कमजोरीने झाली. जागतिक बाजारातील विक्री व चीन मधील पुन्हा कोरोनाचे वाढते रुग्ण व काही शहरातील लॉक डाउन यामुळे बाजार घसरला. परंतु दुपारनंतर ऑटो,बँक,ऑइल आणि गॅस समभागातील खरेदीमुळे सुधारला व बंद होताना दिवसाच्या उच्चतम स्तराजवळ बंद झाला.बाजार बंद होताना सेन्सेक्स २३१ अंकांनी वधारून ५७,५९३ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ६९ अंकांनी वधारून १७,२२२चा बंददिला.

सकारात्मक जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स ३५० अंकांनी वधारला, निफ्टी १७,३०० च्या वर. Sensex gains 350 points, Nifty above 17,300 on positive global cues
रशिया आणि युक्रेनमधील शांतता चर्चा आणि क्रूडच्या किमतीत घसरण झाल्यामुळे व सकारात्मक जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर्स मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढले.आशियाई बाजारातील तेजीचे नेतृत्व जपानी समभागांनी केले कारण बँक ऑफ जपानने वाढत्या उत्पन्नावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपले शिथिल चलनविषयक धोरण कायम ठेवले.कोविड निर्बंधांमुळे चिनी बाजारातून कमी मागणीच्या अपेक्षेने मंगळवारी क्रूडच्या किमती देखील स्थिरावल्या. याचा परिणाम बाजारावर दिसला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३५०अंकांनी वधारून ५७,९४३ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १०३ अंकांनी वधारून १७,३२५ चा बंददिला.

सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स ७४० अंकांनी वधारला. On third day of gains, Sensex surges 740 points
बुधवारी भारतीय बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजीचे वातावरण होते बाजाराने गेल्या ६ महिन्यांतील उच्चांक गाठला. ऑटो, आयटी, बँका, कॅपिटल गुड्स आणि रियल्टी स्टॉकमधील वाढीमुळेसेन्सेक्स ७००अंकांनी वधारला. वाढीचे मुख्य कारण होते रशिया आणि युक्रेनमधील शांतता चर्चेतील प्रगती.जागतिक बाजारात अस्थिरता होती परंतु शांतता चर्चेमुळे युद्ध कमी होण्याची आशा निर्माण झाली, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात आत्मविश्वास निर्माण झाला. क्रूड आणि इतर वस्तूंच्या किमती कमी झाल्यानेही बाजाराला साथ मिळाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ७४० अंकांनी वधारून ५८,६८३ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १७३ अंकांनी वधारून १७,४९८ चा बंददिला.
सलग ३ दिवसांची वाढ थांबली. Market snaps three-day winning streak
गुरुवारी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सलग ३ दिवसांची बाजाराची वाढ थांबली व बाजार लाल चिन्हात बंद झाला.बाजार बंद होताना सेन्सेक्स ११५ अंकांनी घसरून ५८,५६८ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ३३ अंकांनी घसरून१७,४६४चा बंददिला.

सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला ,निफ्टी 17,600 च्या वर. Sensex up 700 points, Nifty above 17,600
शुक्रवारी भारतीय बाजाराने २०२२-२३ या आर्थिक वर्षाला जोरदार सलामी दिली . बँक, पॉवर, ऑइल अँड गॅस आणि रियल्टी समभागांच्या मजबूत कामगिरीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद होण्यात यशस्वी झाले. दिवसभरात सेन्सेक्सने ८०० अंकांची उसळी घेतली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ७०८ अंकांनी वधारून ५९,२७६ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने २०५ अंकांनी वधारून १७,६७० चा बंददिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

2 Apr 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *