केंद्रीय अर्थसंकल्पाला दलाल स्ट्रीटची सलामी
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत
गेल्या आठवड्यात सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे बाजाराने जोरदार स्वागत केले. मार्केटला हे बजेट विकासाभिमुख बजेट(growth oriented budget) वाटल्याने बाजरात उसळी आली..केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाल्याल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार (Economic Survey)FY23 मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) ८-८.५ % राहील असा अंदाज व्यक्त केल्याने(FY23 GDP forecast between 8 and 8.5 percent) बाजार निश्चिंत झाला.
बजेट मध्ये पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी केलेली भक्कम तरतूद तसेच वाढणारे जीएसटी कर संकलन, डिजिटल करन्सी(The government has proposed to issue a digital rupee managed by the RBI,) ,इलेक्ट्रिकल व्हेईकल(new EV policy on battery swapping with interoperability standards);सेझ(sez) साठी नियमात शिथिलता,पंतप्रधान आवास योजनेच्या मार्फत स्वस्त दरात घरे(allocation of Rs 48,000 crore under PMAY urban and rural schemes. Around 80 lakh houses are expected to be completed by 2023 across the country),महामार्गांचे रुंदीकरण,केमिकल फ्री शेतीला प्राधान्य,७५ जिल्यांमध्ये ७५ डिजिटल बँकांचे जाळे उभारणार, लॉन्ग टर्म कॅपिटल टॅक्स वर जास्तीजास्त १५% अधिभार लागेलThe surcharge on the long-term capital gains (LTCG) has been capped at 15% ,capital expenditure साठी FY23 मध्ये ७.५लाख करोड उपलब्ध करून देणार अश्या घोषणांनी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याने खरेदीचा ओघ वाढला व बाजारात तेजी पसरली.
परंतु हि तेजी टिकली नाही युरोझोन मधील महागाईचे आकडे अपेक्षेपेक्षा जास्त आल्याने(Eurozone inflation hits record 5.1%) शेवटच्या दोन दिवसात बाजराची घसरण वाढली. येणाऱ्या आठवडयात बाजरात चढ उताराचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर उत्तम समभागात गुंतवणूक करावी.
आर्थिक सर्वेक्षणाच्या जोरावर बाजार 1% वाढला. Market gains over 1% on Economic Survey
अमेरिकन बाजरातील तेजीच्या जोरावर सोमवारी सकाळी भारतीय बाजराची सुरुवात सकारत्मक झाली. शॉर्ट कव्हरिंग मुळे सेन्सेक्समध्ये १००० अंकांची उसळी आली. मागील दोन दिवसांच्या पडझडीला रिकवर करण्यात बाजार यशस्वी झाला.केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाल्याल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार (Economic Survey)FY23 मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) ८-८.५ % राहील असा अंदाज व्यक्त केल्याने(FY23 GDP forecast between 8 and 8.5 percent) बाजार निश्चिंत झाला व १%अधिक वाढला. बाजार बंद होताना सेन्सेक्स८१३ अंकांनी वधारून ५८,०१४ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २३७ अंकांनी वधारून १७,३३९ चा बंददिला. Sensex, Nifty Log Best Day In Three Weeks Ahead Of Union Budget.
दलाल स्ट्रीटची अर्थसंकल्पाला जोरदार सलामी. Dalal Street gives thumbs up to Budget
मागील सत्रातील सकारात्मकता कायम ठेवत केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजराची सुरुवात तेजीने झाली.अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटला बाजाराने आज मोठी सलामी दिली.व अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर बाजार घसरला परंतु पुन्हा एकदा खालच्या स्तरावरून झालेल्या खरेदीमुळे बाजारात जोश भरला. मार्केटला हे बजेट विकासाभिमुख बजेट(growth oriented budget) वाटल्याने बाजरात उसळी आली.निर्देशांकांत १.५% वाढ झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स८४८ अंकांनी वधारून ५८,८६२ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २३७ अंकांनी वधारून १७,५७६ चा बंददिला.
दुसऱ्या दिवशीही अर्थसंकल्पीय तेजी कायम Budget rally continues for second day
सलग तिसऱ्या दिवशी बाजरात तेजीचा माहोल होता. बजेट रॅलीचा जोर बुधवारी सुद्धा सुरु राहिला. बाजार गॅप अप ओपन झाले व संपूर्ण सत्र सकारत्मक होते. IT, pharma, realty आणी financial समभागातील तेजीच्या जोरावर बाजार दिवसभराच्या उच्चतम स्तराजवळ बंद झाला. बाजराची नजर युरोझोनच्या महागाईच्या आकड्यांवर(Eurozone inflation numbers)तसेच ओपेकच्या बैठकीकडे (OPEC+meeting) होते. बाजार बंद होताना सेन्सेक्स ६९५अंकांनी वधारून ५९५५८ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २०३ अंकांनी वधारून १७,७८०चा बंददिला.
तीन दिवसांच्या तेजीनंतर बाजरात घसरण. Market snaps 3-day gaining streak
सेन्सेक्स व निफ्टीच्या तीन दिवसांच्या तेजीला गुरुवारी ब्रेक लागला. बाजराची सुरुवात घसरणीने झाली दिवसभर कामकाज संथगतीने चालू होते परंतु दुपारनंतर बाजरात शार्प फॉल आला .युरोझोन मधील महागाईचे आकडे हे अपेक्षेपेक्षा जास्त आल्याने बाजराची घसरण अधिक वाढली सेन्सेक्स ९०० अंकांनी घसरला. आय.टी व रिअल इस्टेट क्षेत्रातील घसरणीच्या बाजारावर दबाव वाढवला.ऑटो क्षेत्र वगळता बाकी क्षेत्रातील समभागात खूप पडझड झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ७७० अंकांनीघसरून ५८७८८ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २१९ अंकांनी घसरून१७,५६० चा बंददिला.
सेन्सेक्समध्ये १४३ अंकांची घसरण. Sensex down 143 points
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराची सुरुवात हलक्या तेजीने झाली. परंतु नंतर बाजार घसरला दिवसभरात बाजाराने आपल्या महत्वपुर्ण पातळीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु या चढ उतारांमध्ये बाजरातील कमकुवत पणा जाणवत होता. युरोपियन बाजारातील नरमाईमुळे भारतीय बाजारावर दबाव वाढलाबाजार बंद होताना सेन्सेक्स १४३ अंकांनी घसरून ५८६४४ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ४४अंकांनी घसरून १७,५१६ चा बंददिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)
ML/KA/PGB
5 Feb 2022