“झालमोरी बेचो, सोना मत बेचो” आंदोलनाने लक्ष्मी रोड परिसर दणाणला

 “झालमोरी बेचो, सोना मत बेचो” आंदोलनाने लक्ष्मी रोड परिसर दणाणला

पुणे, दि १४— आज पुण्यातील लक्ष्मी रोड परिसरातील शगुन चौक येथे गुलाबो गॅंग व बिटिया फाउंडेशन तर्फे केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. “झालमोरी बेचो, सोना मत बेचो” या अनोख्या घोषणेद्वारे सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
मोदी सरकारने नागरिकांना पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी करू नये, असे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शगुन चौकातील विविध सराफी दुकानांमध्ये जाऊन दुकानदारांना प्रतीकात्मक स्वरूपात “झालमोरी विकण्याचा” सल्ला दिला. या आंदोलनात महिलांनी हातात झालमोरी घेऊन नागरिकांना तसेच दुकानदारांना वाटप केले आणि सरकारच्या धोरणांवर उपहासात्मक पद्धतीने टीका केली.
यावेळी अष्टेकर सराफचे सचिन अष्टेकर स्वतः उपस्थित होते. त्यांनाही कार्यकर्त्यांकडून झालमोरी देण्यात आली व प्रतीकात्मकरीत्या “झालमोरी विकण्याचे” आवाहन करण्यात आले.
या आंदोलनाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी केले होते. कार्यक्रमास गुलाबो गॅंग व बिटिया फाउंडेशनच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यामध्ये शोभा पणीकर, भारतीय लोंढे, कीर्ती जाधव, पारुल ताई आदींचा समावेश होता.
सामान्य नागरिकांवर वाढती महागाई, आर्थिक ताण आणि सतत बदलणाऱ्या सरकारी भूमिकांमुळे होणारा परिणाम याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *