विष्णू मनोहर यांनी केलेली झालमुडी,खाण्यासाठी नागरिकांची गर्दी

 विष्णू मनोहर यांनी केलेली झालमुडी,खाण्यासाठी नागरिकांची गर्दी

नागपूर दि ९ : सुमारे सहा दशकांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर लोकशाही मार्गाने राष्ट्रवादी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारे सरकार पश्चिम बंगाल मध्‍ये सत्तारूढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांच्‍या वतीने नागपूरमध्ये एक आगळावेगळा ‘झालमुडी महोत्सव’ आयोजित करण्‍यात आला होता. या झालमुडी महोस्तवात विष्णूजी की रसोई, बजाजनगर, नागपूर येथे जागतिक ख्यातीचे शेफ विष्णूजी मनोहर तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत ‘जिव्हाळा’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या महोस्तवात जवळपास 700 किलो झालमुडी तयार करण्यात आली.

एकीकडे पश्चिम बंगाल मध्ये शपथ ग्रहण समारोह होत असताना विष्णू मनोहर यांनी तयार केलेली झालमुडी महोस्तवात झालमुडी खाण्यात नागरिक व्यस्त होते. आकर्षक बंगाली वेशभूषा धारण करून नागरिक आलेले होते. या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून नागपूरकर पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ झालमुडीचा आस्वाद घेत होते. सायंकाळी देखील ६ ते ७ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून तब्बल १००० नागरिकांसाठी पारंपरिक बंगाली झालमुडी तयार करून त्याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल दौऱ्या दरम्‍यान स्थानिक खाद्य संस्कृतीचा अनुभव घेत झालमुडीची चव चाखली आणि तिचे कौतुक केले होते. त्याच संदर्भातून आणि पश्चिम बंगालमधील राजकीय विजयाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम प्रेरित आहे. या कार्यक्रमातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संदेश देत, खाद्यसंस्कृतीच्या माध्यमातून आनंद आणि एकतेचा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे विष्‍णू मनोहर यांनी म्‍हटले आहे.

ML/ SL/ML

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *