ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात आढळले बिबट, अस्वल, रानडुक्कर

 ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात आढळले बिबट, अस्वल, रानडुक्कर

बुलडाणा दि ३ :
जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १ मे च्या रात्री बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात ‘निसर्ग अनुभव’ घेऊन वनविभागाच्या वतीने  प्राणी गणना करण्यात आली. या गणनेदरम्यान वन्यप्रेमी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अनेक महत्त्वाचे वन्यजीव पाहायला मिळाले. प्राणी गणना करण्यासाठी वनविभागाच्या वतीने ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये ४४ मचानी उभारण्यात आल्या होत्या.

अभयारण्यातील मुख्य शिकारी असलेला बिबट्याची संख्या २५ आढळून आली तर अनेक ठिकाणी दृष्टीस पडला. ज्ञानगंगा हे अस्वलांसाठी प्रसिद्ध आहे, या गणनेतही त्यांची २९ एवढी अस्वलांची संख्या लक्षणीय आढळली.

२३१ रानडुक्कर, २० सायाळ, २२ ससे, ९ तरस ,२८ भेडकी, निलगाय १४५ आणि ८१ मोर लांडोर ,तर ४ चिंकारा , हरीण १९ , खवले मांजर २ , रानमांजर‌ ३, माकड १६ ,
सांबर १ असे एकूण ६३५ वन्यप्राणी आढळून आले.

वन विभागाच्या वतीने जैवविविधतेविषयी या कार्यक्रमादरम्यान अगोदर माहिती देण्यात आली, तसेच नागरिकांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी उपक्रमामुळे चालना मिळत असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनरक्षक चेतन राठोड, वनपरिक्षेत्र वन्यजीव विभाग खामगाव चे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांच्यासह विध्वनी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

वन्यजीव विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ४४ मचानीवरून पर्यटकांना प्राणी पाहता आले. इतर प्राणी याशिवाय नीलगाय, सांबर, चितळ, भेकर आणि जंगली डुक्कर यांसारखे प्राणी मोठ्या प्रमाणावर पाणवठ्यांवर आले होते. ही गणना ‘मचाण’ पद्धतीचा वापर करून केली जाते, जिथे निसर्गप्रेमी रात्रभर पाणवठ्याजवळ बसून प्राण्यांच्या नोंदी घेतात. यामुळे अभयारण्यातील वन्यजीवांची स्थिती आणि त्यांच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती मिळते. यासाठी जिल्हाभरातील ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले होते.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *