दीनदयाल सेवा प्रतिष्ठानला मानकर ट्रस्ट चा ‘कर्मयोगी पुरस्कार’ प्रदान

 दीनदयाल सेवा प्रतिष्ठानला मानकर ट्रस्ट चा ‘कर्मयोगी पुरस्कार’ प्रदान

मुंबई दि. ३ : स्वातंत्र्यप्राप्तीला अनेक दशके उलटून गेल्यानंतरही विकासापासून वंचित राहिलेला पारधी समाज तसेच नापिकी, कर्जबाजारीपण मुळे त्रस्त शेतकरी बांधवांच्या उत्थानासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करीत असलेल्या कार्याकरिता यवतमाळच्या दीनदयाल सेवा प्रतिष्ठानला कै. लक्ष्मणराव मानकर संस्थेचा ‘कर्मयोगी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

शाल, सोनचाफ्याची परडी, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि दोन लक्ष रुपयांचा धनादेश या स्वरूपातील पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहनजी भागवत व केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, विधानसभाध्यक्ष ॲड् राहुल नार्वेकर, आदिवासी विकास मंत्री डाॅ. अशोक उईके, राज्यसभा सदस्य माया इवनाते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

मुंबईच्या ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या शानदार समारंभात संस्थेचे सचिव विजयराव कद्रे, सहसचिव विवेक कवठेकर, कोषाध्यक्ष धनंजय चौहान, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन परसोडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तत्पूर्वी संस्थेच्या कार्याची ओळख करून देणारा माहितीपट दाखविण्यात आला.

ML/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *