ठाणे ग्रामीण पोलीस विभागातील शितल खरटमल यांना नीती आयोगाचा “भारत विभूषण”राष्ट्रीय पुरस्कार
भिवंडी, दि २४
नीती आयोगातर्फे उदयपूर येथे सुमो रेसलिंग- स्पर्धेमध्ये डबल एशियन मेडल प्राप्त करणाऱ्या ठाणे ग्रामीण पोलीस विभागातील खेळाडू,ठाणे जिल्ह्याच्या व महाराष्ट्रातील एकमेव महिला आंतरराष्ट्रीय खेळाडू शितल मल्लिकार्जुन खरटमल यांना उदयपूर येथे “भारत विभुषण” या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदर प्रसंगी राजस्थान विधान परिषदेचे व्हॉइस सेक्रेटरी सारंगदेवोत, इंडियन आर्मी लेफ्टनंट जनरल एन.के. सिंग, ग्लोबल प्रेस्टेज नारायण सेवा संस्थाचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल हस्ते नुकताच सन्मानित करण्यात आले.
पोलीस विभागातील शितल सारख्या गुणी खेळाडू मिळविलेल्या या पुरस्कारा बद्दल संजय दराडे (आईजी कोकण परिक्षेत्र,नवी मुंबई) यांनी तिने मिळवलेल्या या यशाबद्दल व स्पर्धेतील नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल पोलीस विभागाचे नाव भविष्यातही उज्वल करण्यासंबंधी शुभेच्छा व्यक्त करत तिचा यातच विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
शितल खरटमल यांच्या क्रीडा क्षेत्रातील यश संपादनाने ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के,रवींद्र पाठक, सुधीर कोकाटे (नगरसेवक) इत्यादी मान्यवरांनी तिचा सन्मान करीत भविष्यातील क्रीडा क्षेत्रातील
कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.JS/ML/MS