कामगार नेते, जेष्ठ पत्रकार विनायक चक्रे यांचे निधन

 कामगार नेते, जेष्ठ पत्रकार विनायक चक्रे यांचे निधन

पुणे, दि १७
कामगार नेते व जेष्ठ पत्रकार कॉम्रेड विनायक चक्रे (वय ७९ वर्षे) यांचे शुक्रवारी सकाळी संत तुकाराम नगर येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील कामगार चळवळीत ८० – ९० च्या दशकात ते खूप सक्रिय होते. बजाज ऑटो, टेल्को, बजाज टेम्पो कंपनीच्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. रस्टन ग्रीव्हज कंपनी सेवेतून ते निवृत्त झाले आणि पुढील आयुष्य सार्वजनिक कार्यासाठी वाहून घेतले. शहरातील लहान मोठ्या कंपनीतील वेतन करार, कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचे योगदान होते.
विविध संप, आंदोलनात त्यांचा सहभाग कायम होता. दैनिक सामना, लोकसत्ता, महाराष्ट्र हेराल्ड आदी वर्तमानपत्रातून त्यांनी पत्रकारिता केली. त्यांच्या जाण्याने एक प्रखर प्रामाणिक कामगार नेता, परखड पत्रकार आणि पिंपरी चिंचवड शहरातील कामगार चळवळीतील एक मार्गदर्शक हरपला आहे. कॉम्रेड सतत आमच्या स्मरणात राहतील अशी भावना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी व्यक्त केली.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *