लोअर परळ येथे झाले मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात आंदोलन

 लोअर परळ येथे झाले मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात आंदोलन

मुंबई, दि १२
लोवर परळी येथील रेल्वे पूलखाली असणाऱ्या मोकळ्या जागे संदर्भात म्हणतोय मंगल प्रभात लोढा हे हस्तक्षेप करत असल्याबाबत स्थानिक रहिवाशांच्या आणि शिवसेनेच्या वतीने झाले आंदोलन.
लोअर परळ येथील रेल्वे पुलाखालील मोकळ्या जागेमध्ये ज्येष्ठ नागरीकांकरीता विरंगुळा केंद्र, लहान मुलांकरीता गार्डन तसेच तरूणांकरीता ओपन जिम इ. सुविधा निर्माण करून त्याचा सद्या होणारा दुरूपयोग टाळावा म्हणून आमदार अजय चौधरी आणि विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांनी महानगरपालिकेकडे प्रस्ताव सादर केला होता. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही आयोजित केली होती. महानगरपालिकेच्या जी/दक्षिण कार्यालयाने यासंदर्भातील आराखडे मंजुरीकरीता मुख्य कार्यालयाकडे सादर केले होते. इतकेच नव्हेतर आमदार श अजय चौधरी यांनी जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्र्यांकडून या सुविधांकरीता ३ कोटी रूपयांचा निधी नगरविकास खात्याकडून वर्ग करून घेतला होता. परंतु हे सगळ माहित असतानाही मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून ही मोकळी जागा शिवकल्याण केंद्र या संस्थेस दयावा म्हणून पत्रव्यवहार व बैठक घेत आहेत. याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. हा संपूर्ण रहिवाशी पट्टा असून येथे कष्टकरी, गिरणीकामगार तसेच ग्रामस्थांच्या खोल्या व म्हाडा इमारतीतील रहिवाशी असून या रहिवाशांचा या मोकळया जागेवर नैतिक अधिकार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्थानिकांना देण्यात येणाऱ्या या सुविधांवर कोणीही खासगी संस्थांच्या माध्यमातून डल्ला मारण्याचा प्रयत्न केला तर स्थानिक रहिवाशी सहन करणार नाही. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्थानिकांना विश्वासात न घेता करण्यात येणाऱ्या त्यांच्या या सर्व प्रयत्नांचा शिवसेना आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने तीव्र निषेध करत असल्याची माहिती आमदार अजय चौधरी आणि नगरसेवक निशिकांत शिंदे यांनी दिली.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *