स्वराशा हरपली, श्रोत्यांना शोकावेग

 स्वराशा हरपली, श्रोत्यांना शोकावेग

मुंबई, दि. १२ : विविध भाषांमधील बारा हजारांहून अधिक सुमधुर गीतांमधून रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (९२) यांचे आज मुंबईत निधन झाले. पंडीत दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या भगिनी अशी थोर सांगीतिक परंपरा लाभलेल्या आशाताईंनी आपल्या स्वतंत्र प्रतिभेच्या बळावर भारतीय चित्रपट संगीत आणि भावसंगीतामध्ये आपली अमीट नाममुद्रा उमटवली. आठ दशके रसिकांना सूरांची मोहिनी घालणाऱ्या आशाताईंच्या जाण्याने “अभी ना जाओ छोड कर, के दील अभी भरा नही” या त्यांनी गायलेल्या प्रसिद्ध गीतातील भावनाच आज त्याच्या देशासह जगभरातील चाहत्यांच्या मनात दाटून आल्या आहेत. उद्या सकाळी ११ वाजल्यापासून लोअर परळला त्यांच्या निवासस्थानी पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी सुमारे आठ दशकांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली. त्यांनी केवळ हिंदीमध्येच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला ठसा उमटवला. ‘दम मारो दम’, ‘रमैया वस्तावैया’, ‘ऐ मेरे हमसफर’, ‘ये मेरे वतन के लोगो’ (बॅकग्राउंड), ‘क्या करें’ सारख्या अनेक सुपरहिट गाण्यांनी त्यांनी अनेक पिढ्यांच्या मनात स्थान मिळवले होते. आशा भोसले यांना ‘आशा ताई’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या खास आवाजातील ऊर्जा, विविधता आणि भावपूर्ण गायकीमुळे त्यांना ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’ आणि ‘Queen of Indipop’ अशा उपाधी मिळाल्या होत्या.

रोमँटिक, गझल, पॉप, आयटम साँग अशा सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी गायली. आशा भोसलेंची आरडी बर्मन यांच्यासोबतची जोडी खूप गाजली. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, चुरा लिया है तुमने ही त्यांची प्रसिद्ध गाणी आहेत. त्याचबरोबर ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. अनेकदा फिल्म फेअर पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या आशाताईंना पद्म भूषण आणि पद्म भूषण या दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *