कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या ‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच

 कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या ‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच

पुणे, दि १०

उन्हाळ्याच्या सुटीत कॉमेडीचा सुखद अनुभव देणाऱ्या पिक्चर बॉईज या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. १५ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, चित्रपटांमध्ये हिरो होण्यासाठी धडपडणाऱ्या दोन तरूणांची धमाल गोष्ट या चित्रपटात पाहता येणार आहे.

त्रिमूर्ती फिल्म्सनं ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार, राजा पांडुरंग पंडितपवार हे या चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी केशव पाटील हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन निलेशसिंह राजपूत यांनी केलं आहे. मंदार चोळकर, सुनील दोडगे, संध्या-प्रनिकेत यांनी लिहिलेल्या गीतांना वरुण लिखाते आणि संध्या-प्रनिकेत यांनी संगीतबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते, एल. के. लक्ष्मीकांत यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. विनोद पाटील यांनी छायांकन, रोहन पाटील यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते, एल. के. लक्ष्मीकांत यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख, पवन चुरे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), प्रिया तुळजापूरकर, सूरज पाटील, किरण पाटील, नम्रता पोटे, निभिया शर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, प्रशांत तपस्वी, मिलिंद दास्ताने, विजय खंदारे, साक्षी पंडितपवार, विजय गिते, अंकिता राऊत अशी नव्या जुन्या कलाकांची फळी चित्रपटात आहे.

“पिक्चर बॉईज” या चित्रपटातून एक धमाल गोष्ट मांडण्यात आली आहे. चित्रपट क्षेत्राची फारशी काही माहिती नसलेल्या दोन तरुणांना हिरो व्हायचं असतं. चित्रपटाच्या क्षेत्रात आल्यानंतर त्यांच्या वाट्याला काय काय अनुभव येतात, त्यातून काय धमाल विनोदी प्रसंग घडतात याचं कथानक चित्रपटात मांडण्यात आलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधूनही त्याची झलक मिळत आहे. त्यामुळेच चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. मजेशीर कथानक, उत्तम लेखन, ताल धरायला लावणारं संगीत, दमदार अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. उन्हाळ्याच्या सुटीत पुरेपूर मनोरंजन करणारा पिक्चर बॉईज हा चित्रपट सहकुटुंब चित्रपटगृहात जाऊनच पाहावा लागणार आहे.

Teaser Link

https://youtu.be/yZsR-_U-9S4
[10/04, 16:01] +91 97303 84211: महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षात त्यांचे साहित्य प्रकाशित करा : उपमहापौर परशुराम वाडेकर यांची मागणी

पुणे : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त देशभर व राज्यभर विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. मात्र, या महत्त्वाच्या वर्षातही महात्मा फुले यांचे समग्र साहित्य शासनाच्या वतीने प्रकाशित झाले नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत तीव्र खंत व्यक्त करत पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

उद्या महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शासकीय फोटो झिंको तसेच संबंधित शासकीय विभागांकडून महात्मा फुले यांच्या साहित्याची मागणी करण्यात आली असता, असे कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे संताप व्यक्त करत वाडेकर यांनी संबंधित विभागाने तातडीने महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय तसेच त्यांच्याशी संबंधित सर्व साहित्य प्रकाशित करावे, अशी मागणी केली आहे.

तसेच, राज्य शासनाच्या प्रकाशन विभागाचे प्रमुख या नात्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून सर्व साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *