महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला केंद्रीय मंत्रिडळाची मंजुरी

 महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला केंद्रीय मंत्रिडळाची मंजुरी

फोटो स्रोत PTI

नवी दिल्ली, दि. 9 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नारी शक्ती वंदन कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागांची संख्या सध्याच्या 543 वरून 816 पर्यंत वाढेल, ज्यापैकी 273 जागा महिलांसाठी राखीव असतील. 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे, त्यामध्ये हे सुधारणा विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिला आरक्षणानंतर उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जागांमध्ये सर्वाधिक 40 जागांची वाढ होऊन एकूण जागा 80 वरून 120 होणार आहेत. महाराष्ट्रात महिलांसाठी 24 जागा राखीव ठेवल्या जातील, ज्यामुळे लोकसभेच्या जागा 48 वरून 72 होतील.

संसदीय मंजुरी मिळाल्यानंतर, हा कायदा 31 मार्च 2029 रोजी लागू होईल. तो प्रथम त्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रभावी होईल. प्रस्तावानुसार, आरक्षण उभ्या तत्त्वावर लागू केले जाईल, म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या जागांमध्येही महिलांचा वाटा निश्चित केला जाईल.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *