डाॅ. अनघा राऊत यांचा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव
मुंबई, दि. ९ : विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथील ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विद्या एज्युकेशन सोसायटीच्या उपमुख्य अधिकारी डाॅ. अनघा राऊत यांचा मंडळाचे सचिव ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मंडळाची स्मरणिका देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे आजीव सभासद व विकास हायस्कूलचे प्रशासकीय अधिकारी मोहन वत्स यांच्यासह विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या समन्वयक विजया राधाकृष्णन, विकास हायस्कूल मराठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दर्शना कर्नुक तसेच विकास हायस्कूल इंग्रजी प्राथमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका वंदना सूर्यवंशी आणि मंजुषा पाचपुते आदि शिक्षक उपस्थित होते. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त दांपत्य गुरूवर्य प. म. राऊत व विद्या प. राऊत यांच्या डाॅ. अनघा राऊत या स्नुषा आहेत. तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डाॅ. विनय प.राऊत यांच्या त्या पत्नी आहेत.JS/ML/MS