‘घबाडकुंड’ सिनेमॅटिक युनिव्हर्सचा अनुभव देणारा मराठी थरारपट
मुंबई, दि. 8 : प्रयोगशील दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील अल्याड पल्याड’च्या मोठ्या यशानंतर आता ‘घबाडकुंडट ‘ हा नवीन थरारपट घेऊन आले आहेत. कल्पनेच्या पलीकडचं ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटीलने केला आहे. त्याच्या या नव्या संकल्पनेला आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ.रसिक कदम यांची साथ लाभली आहे. दिग्दर्शकाचा आगामी हॉरर ‘घबाडकुंड’ हा चित्रपट येत्या 19 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
याबाबत दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील म्हणाले, ” मनोरंजनासोबत थरारक आणि मसालेदार अनुभवासाठी प्रेक्षक अनेकदा हिंदी चित्रपटांकडे वळताना दिसतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन मराठी चित्रपटांना हॉररचा एक वेगळा तडका देण्याचा मी प्रयत्न केला आहे. या चित्रपटातून हॉरर या जॉनरला हाताळताना अॅक्शन, इमोशन आणि ड्रामा यांचा संगम साधला आहे. एकंदरीत हा चित्रपट प्रेक्षकांसाठी संपूर्ण मनोरंजनाचं पॅकेज ठरेल, असा मला विश्वास आहे. ”
SL/ML/SL