मुंबईत धावणार ‘ड्रायव्हरलेस’ पॉड टॅक्सी

 मुंबईत धावणार ‘ड्रायव्हरलेस’ पॉड टॅक्सी

मुंबई, दि. ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज मुंबईत वांद्रा- कुर्ला संकुलात पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. शहरातील सर्वात दाट लोकवस्ती असेलेल्या परिसरांमध्ये ही टॅक्सी धावणार आहे. लवकरच ही टॅक्सी शहरात सुरू होणार असून प्रवास जलद व आरामदायी होण्याची अपेक्षा आहे. शहरातील कुर्ला आणि वांद्रे पूर्वदरम्यान पहिल्या टप्प्यात पॉड टॅक्सीची सुरुवात होणार आहे. या भागात 3.36 किमी मार्गावर ही टॅक्सी धावेल. या मार्गावर एकूण 8 स्थानकं असतील. वांद्रे पूर्व, कलानगर,एमएमआरडीए जुनी इमारत, एक्साईझ डिपार्टमेंट, भारत डायमंड बोर्स गेट 11, एमएमआरडीए पे अँड पार्क, एलबीएस मार्ग आणि कुर्ला या स्थानकांवर थांबे असतील. वांद्रे-कुर्ला संकुलात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या टॅक्सीचा मोठा फायदा होणार आहे.

ही पॉड टॅक्सी पूर्णपणे ड्रायव्हरलेस असून 8 मीटर उंच खांबांच्या आधारे 8 इंच रुंदीच्या एलिव्हेटेड ट्रॅकवरून धावेल. या टॅक्सीची लांबी 3.5 मीटर असून रुंदी 1.47 मीटर आणि उंची फक्त 1.8 मीटर असेल. यामुळे पॉड टॅक्सीने मुंबईच्या वाहतूककोंडीतून प्रवास करणं सोपं होणार आहे.

2031 पर्यंत पॉड टॅक्सीच्या मार्गाचा 8.85 किमीपर्यंत विस्तार करण्याची योजना आहे. या मार्गावर 22 स्थानकं असतील. यापूर्वी 38 स्थानकांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. पण नंतर त्यांची संख्या कमी करून ती 22 करण्यात आली.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *