नगरसेविका अर्चनाताई शिंदेने रुग्णालयात फळे वाटून साजरा केला वाढदिवस!
मुंबई, दि ७
धारावीतील वार्ड क्रमांक १८६च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका सौ.अर्चना अविरत शिंदे यांनी नगरसेवकपदी निवडून आल्यावर मोठा गाजा वाजा न करता साधेपणाने वाढदिवस साजरा केला.
नगरसेविका अर्चना शिंदे यांनी अत्यंत साधेपणाने आणि सेवाभावी उपक्रमातून जबाबदारीची जाणीव ठेवून लोकमान्य टिळक महानगरपालिका सायन रुग्णालय,आयुर्वेदिक रुग्णालय सायन व टाटा कॅन्सर रुग्णालय येथे जाऊन रुग्णांना फळाचे वाटप करुन त्यांचे आशीर्वाद घेतले.यावेळी पंचशील गणेश मंदिर मंडळाचे पदाधिकारी तसेच शिवसेना शाखा क्र. १८६ चे शाखाप्रमुख किरण काळे, शिवसेना धारावी उप विभाग प्रमुख महादेव शिंदे, शिवसेनेचे पदाधिकारी आणि युवा सेनेचे युवा सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.JS/ML/MS