उल्हासनगरात मध्यवर्ती रुग्णालयातील विविध समस्यांन बाबत मनसे शिष्ट मंडळाने घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट

 उल्हासनगरात मध्यवर्ती रुग्णालयातील विविध समस्यांन बाबत मनसे शिष्ट मंडळाने घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट

उल्हासनगर, दि ७
उल्हासनगर ३ मध्ये मध्यवर्ती रुग्णालय असून या रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त आहे.परंतु जिल्हा रुग्णालया सारख्या कोणत्याही सोई – सुविधा या रुग्णालयात उपलब्ध नाहीत. डॉक्टरांची अपुरी संख्या / सातत्याने बंद पडणारी सिटीस्कॅन मशीन / वारंवार बंद पडणारी सोनोग्राफी मशीन ओ.पी.डी. ची अपुरी संख्या पॅथॉलॉजी मधील गर्दी व तेथे लागणाऱ्या रुग्णांच्या रांगा / ओषधांचा तुटवडा / कर्मचाऱ्यांची अरेरावी। स्वच्छतेचे तीन तेरा अशा अनेक समस्यांनी या रुग्णालयाला ग्रासले आहे. या रुग्णालयात कर्जत । कसाऱ्या पासून ठाणे जिल्यातील ग्रामीण भागातून आदिवासी व गोरगरीव दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. गोर-गरीब रुग्ण मोठ्या आशेने येत असतात. त्यांना वाटतं की या ठिकाणी गेल्यानंतर मला चांगले उपचार मिळतील व मी लवकर बरा होईल. परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या पदरी केवळ आणि केवळ निराशाच पडते.या संदर्भात आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांची बाबत मनसे शिष्ट मंडळाने भेट घेऊन यावर तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती केली.
आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.त्या बद्दल मनसेच्या वतीने बंडू देशमुख यांनी आरोग्य मंत्र्यांचे आभार व्यक्त केले. याच विषयात आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे व अतिरिक्त संचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांचीही भेट घेतली.कारण मध्यवर्गीय किंवा श्रीमंत माणूस आपल्या रुग्णालयात येत नाही. परंतु गरीबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयातील उपचार परवडत नाहीत. किंवा त्याच्या आर्थिक परिस्तिथी मुळे ते श्यक्य होतं नाही. त्यामुळे ते रुग्ण नाईलास्तव आपल्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात व त्या रुग्णांना चांगली सेवा देणे हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे.तसेच या रुग्णालयात डॉक्टरांच्या वर्ग १ च्या मंजूर १६ पदापैकी ९ पद ही रिक्त आहेत. व आरोग्य सेवा गट -अ च्या २९ मंजूर पदापैकी ९ पद रिक्त आहेत. तर उर्वरित २० डॉक्टरांनतुन एका डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. तर एक डॉक्टर हे ०३ / ०७ / २०२४ पासून रजेवर आहेत. एक डॉक्टर उपसंचालक कार्यालयात कार्यरत आहेत. तर एक डॉक्टर उपमुख्यमंत्री यांच्याकडे कार्यरत आहेत. आणि जी डॉक्टरांची पद रिक्त आहेत ती अत्यन्त महत्वाची पद आहेत. व त्यामुळे रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांची रिक्त पद तात्काळ भरण्यात यावीत व गोर – रुग्णांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी मनसे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली.
मनसेने आपल्या निवेदनाद्वारे आशा विविध मागण्या केल्या आहेत त्यात
१) या रुग्णालयातील CT-SCAN मशीन हे जून वर्जर्न असल्यामुळे सातत्याने बंद पडते. व तिचे पार्ट मिळत नसल्यमुळे आठ आठ दहा दहा दिवस बंद असते तरी ती बदलून नवीन मशीन बसवण्यासाठी ठेकेदाराला तात्काळ परवानगी देण्यात यावी. २) या रुग्णालयातील “वर्ग – १” व आरोग्य सेवा गट “अ” डॉक्टरांची रिक्त पद तात्काळ भरण्यात यावीत. ३) पॅथॉलॉजी मध्ये रुग्णांची गैर होणारी गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. ४) गोर-गरीब रुग्णांना बाहेरून MIRI करणे शक्य होतं नाही त्यामुळे या रुग्णालयात शक्य तितक्या लवकर एम आर आय ( MRI) सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. ५) रुग्णालयातील रुग्णांची गर्दी पाहता डॉक्टर व ओ.पी.डी.ची संख्या वाढवण्यात यावी. ६) मध्यवर्ती रुग्णालयाच्या ४०० खाटांच्या प्रस्थावाला तात्काळ मंजूरी देण्यात यावी. ७) आपल्या रुग्णालयात कमीत कमी ३ रुग्ण वहिका व एक शव वाहिनी तात्काळ उपलब्ध करण्यात यावी. ८) सकाळी गर्दीच्या वेळी केस पेपर काऊंटरची संख्या वाढविण्यात यावी. ९) रुग्णालयातील व रुग्णालयाच्या सौच्छालयातील अस्वछता पाहता रुग्णालयाच्या स्वच्छतेवर भर देण्यात यावा. १०) कर्मचारी व डॉक्टर यांना रुग्णालयात वेळेत उपस्थित राहण्याची सक्त ताकीद देण्यात यावी. व जे डॉक्टर किंवा कर्मचारी वेळेत उपस्थित नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ११) डॉक्टर व कर्मचारी यांनी रुग्णांशी सौजण्याने वागण्याच्या सूचना देऊन सक्त देण्यात याव्यात. १२) एखादा रुग्ण आपल्या रुग्णयात आणल्याणानंतर त्या रुग्णवर उपचार करण्याऐवजी आपले डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना ठाण्याला घेऊन जा मुंबईला घेऊन जा रायगडला जा असे सल्ले देऊन रुग्णांवर उपचार करण्याऐवजी आपलं काम कमी कस होईल यासाठी प्रयत्नशील असतात अश्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. या मागण्यांचा समावेश आहे
जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर गोर-गरीब रुग्णांच्या न्याय हक्कासाठी मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा ईशारा आरोग्य प्रशासनाला देण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख विभाग अध्यक्ष अनिल गोधडे, अमोल पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *