त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट

 त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट

नाशिक, दि. ६ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात “रांगेत उभे राहू नका, आम्ही तुम्हाला थेट दर्शन घडवून देतो,” असे आमिष दाखवून एजंट भाविकांची लूट करत आहेत. अधिकृत नियमानुसार व्हीआयपी दर्शनासाठी केवळ 200 रुपये शुल्क आहे. मात्र, एजंट प्रत्येकी 3 ते 4 हजार रुपये मागत आहेत. “आम्हाला सांगण्यात आले की रांगेत खूप वेळ लागेल, पैसे द्या आम्ही लगेच दर्शन करून देतो. श्रद्धेपोटी अनेकजण ही रक्कम देतात, पण ही उघड लूट आहे,” अशी भावना एका भाविकाने व्यक्त केली. ज्या व्यक्तीसोबत हा प्रकार घडल्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्याने लगेचच आरडा ओरडा सुरू केला. त्याच्या सोबत घडलेली घटना एका व्यक्तीने शूट केली. हा शूट केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडिओ एका भाविकाने व्हायरल केला आहे.

काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी भाविकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाची मॅजिस्ट्रेट चौकशी अद्याप सुरू आहे. दरम्यान मंदिर परिसरात दर्शनाचा बाजार करणारे एजंट्स चे राज्य निर्माण झाल्याने मंदिर प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *