मे अखेरपर्यंत Air India कडून इस्रायलची विमानसेवा रद्द
मुंबई, दि. 6 : इराण- अमेरिका – इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्रायलला जाणारी आपली विमानसेवा ३१ मे पर्यंत स्थगित केली आहे. Air India च्या एका अधिकाऱ्याने याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, एअरलाइनने नवी दिल्ली-तेल अवीव मार्गावरील विमानसेवा ३१ मे पर्यंत स्थगित केली आहे. बहुतेक प्रमुख एअरलाइन्सनी तेल अवीव मार्गावरील आपली सेवा स्थगित केली असून केवळ एल अल, इस्राइर, अर्किया आणि एअर हैफा यांसारख्या इस्रायली एअरलाइन्सच कडक निर्बंधांखाली कार्यरत आहेत.
विमानसेवा स्थगित झाल्याने इस्रायलमध्ये राहणाऱ्या ४० हजार हून अधिक भारतीयांसाठी ही चिंतेची बाब आहे. हे नागरिक वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांमुळे, किंवा प्रदेशातील वाढत्या तणावामुळे इराण सोडून जाऊ इच्छितात. इस्रायल सोडून जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना जॉर्डन किंवा इजिप्तमार्गे भू-सीमेवरून प्रवास करावा लागतो. तेल अवीवमधील भारतीय दूतावास प्रवास करू इच्छिणाऱ्यांना विविध मार्गांनी मदत करत आहे. दूतावासाने या समुदायाशी नियमित संपर्क ठेवला आहे. २४ तास आपत्कालीन हेल्पलाइन सुरू केली आहे आणि मोठ्या प्रमाणावर नोंदणी मोहीम राबवली आहे.
दूतावासाने आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे सांगितले की, राजदूत जे. पी. सिंग आणि दूतावासाच्या टीमने शनिवारी इस्रायलमधील भारतीय कामगार आणि विद्यार्थ्यांशी आभासी चर्चा केली. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांना सध्याच्या संकटाच्या काळात आणि त्यानंतरही सतत पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
SL/ML/SL