मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवा 35 दिवसांतच ठप्प

 मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवा 35 दिवसांतच ठप्प

मुंबई, दि. 6 : मुंबई ते विजयदुर्ग रो-रो प्रवाशांच्या सेवेत दाखल. मात्र, महाराष्ट्रातील बहुचर्चित मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवा 35 दिवसात बंद झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा तात्पुरत्या कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन, गृह विभाग (बंदरे व परिवहन) महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे परिपत्रक काढत याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देऊन, नियमांनुसार सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ जहाजाच्या दुरुस्तीच्या कामावर सातत्याने देखरेख ठेवून आहे असे या परित्रकात म्हंटले आहे.

मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यान रो-पॅक्स प्रवासी फेरी सेवा दि. 1 मार्च 2026 पासून सुरू करण्यात आली आहे. एमटूएम फेरीज् प्रा. लि. कंपनीच्या “M2M प्रिन्सेस” या जहाजाद्वारे चालविण्यात येणाऱ्या या सेवेच्या माध्यमातून मुंबईहून विजयदुर्ग येथे केवळ 6 ते 7 तासांत पोहोचणे शक्य झाले आहे. सदर फेरीसेवेच्या आतापर्यंत एकूण 6 फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत. सहाव्या फेरीदरम्यान विजयदुर्गहून मुंबईकडे परत येत असताना समुद्रातील तरंगत्या कचऱ्यामुळे जहाजाच्या इंजिनामध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे, जहाजाच्या एकूण 4 इंजिनांपैकी सध्या केवळ 1 इंजिन कार्यरत असून उर्वरित 3 इंजिनांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या अनपेक्षित तांत्रिक बिघाडामुळे सदर फेरीसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *