१३वी विनाइल इंडिया २०२६’ पीव्हीसी शिखर परिषद होणार ९ आणि १० एप्रिल रोजी हॉटेल सहारा स्टार ला.
मुंबई, दि ६: भू-राजकीय तणाव, अस्थिर व्यापारप्रवाह, किंमतीतील चढ-उतार आणि पुरवठा साखळीतील अडथळे यांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, जागतिक पीव्हीसी उद्योग एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभा असून या निर्णायक काळात १३वी विनाइल इंडिया
(VINYL INDIA 2026)’ ही जगातील सर्वात मोठी पीव्हीसी शिखर परिषद व प्रदर्शन जागतिक पीव्हीसी मूल्य साखळीला एका व्यासपीठावर आणण्यास मदत करेल.
१३वी विनाइल इंडिया २०२६’ची ही १३ वी आवृत्ती असून ती ९ आणि १० एप्रिल दरम्यान हॉटेल सहारा स्टार, मुंबई येथे होत आहे. १२०० पेक्षा अधिक प्रतिनिधी, ५३० पेक्षा अधिक संस्था आणि वीसहून अधिक देशांचा सहभाग यात अपेक्षित आहे आणि त्यामुळे पीव्हीसी क्षेत्रातील हे एक सर्वात प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.
दोन दिवसांच्या या परिषदेत जागतिक स्तरावरील वक्ते सहभागी होणार असून विविध व्यावसायिक सत्रे व पॅनेल चर्चांमधून अनेक विषयांवर चर्चा होईल. पीव्हीसीचे भविष्यातील रोडमॅप, जागतिक व भारतीय आर्थिक परिदृश्य, शेती व जलसुविधांमधील मागणी, व्यापारावर भूराजकीय परिणाम, किंमत अस्थिरता व पुरवठा साखळी, शाश्वतता व वर्तुळाकार अर्थव्यवस्था, नवकल्पना व भविष्यातील नाविण्यपूर्णता तसेच रसायन उद्योगातील एआयचा प्रभाव या विषयांवर चारच झडणार आहे.
ही परिषद पीव्हीसी रेझिन उत्पादक, पाइप व प्रोफाइल उत्पादक, कन्व्हर्टर्स व कंपाउंडर्स, अॅडिटिव्हज व केमिकल कंपन्या, यंत्रसामग्री उत्पादक, तंत्रज्ञान पुरवठादार, व्यापारी आणि जागतिक ट्रेडर्स, संपूर्ण पीव्हीसी मूल्य साखळीतील घटकांना एकत्र आणणारे धोरणात्मक व्यासपीठ ठरेल.
परिषदेपूर्वी बोलताना ‘एलाइटप्लस++ बिझिनेस सर्व्हीसेस’च्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालिका निधी वर्मा, म्हणाल्या, “तेरावे विनाइल इंडिया २०२६’ परिषद अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आयोजित केली जात असून या आवृत्तीत संपूर्ण मूल्यसाखळी एका मंचावर येऊन विचारांची देवाणघेवाण, आव्हानांवर चर्चा आणि नवीन विकासाच्या संधींचा शोध घेईल.
परिषदेत जागतिक स्तरावरील वक्ते, प्रभावी सत्रे आणि पॅनेल चर्चांद्वारे पीव्हीसी क्षेत्राचे भविष्य साकारले जाईल.
१३वी विनाइल इंडिया २०२६’ हे जागतिक अंतर्दृष्टी, सहकार्य आणि उद्योगविकासासाठी एक प्रभावी व्यासपीठ राहिले आहे आणि भारताची वाढती भूमिका त्यातून अधोरेखित करते.”
‘एलाइटप्लस++ बिझिनेस सर्व्हीसेस’ हे या परिषदेचे आयोजक असून प्लास्टिक्स, पॉलिमर्स, पेट्रोकेमिकल्स आणि पॅकेजिंग क्षेत्रातील १५ हून अधिक वर्षांचा अनुभव आणि १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्या आयोजनाच्या अनुभवासह एक अग्रगण्य जागतिक संस्था आहे. भारत सरकारच्या रसायन व पेट्रोकेमिकल्स विभागाच्या पाठिंब्याने ही संस्था उद्योगातील सहकार्य आणि विकासाला चालना देते.
पायाभूत सुविधा विकास, सिंचन व जलपुरवठा प्रकल्प, गृहनिर्माण, स्वच्छता उपक्रम आणि औद्योगिक विस्तार यांच्या जोरावर भारत पीव्हीसी मागणीसाठी एक महत्त्वाचे विकासकेंद्र म्हणून उदयास येत आहे. सध्या भारतीय पीव्हीसी बाजाराचा आकार सुमारे ४.३ एमएमटीए असून तो दरवर्षी ६ ते ८% दराने वाढत आहे आणि हा दर जीडीपी वाढीपेक्षा अधिक आहे.
मूल्याच्या दृष्टीने विचार करता हे क्षेत्र सुमारे ३५००० कोटी रुपयांचे असून २०३० पर्यंत ते जवळपास ५० हजार कोटींवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. मात्र, उच्च भांडवली गुंतवणूक आणि उत्पादनातील गुंतागुंत यामुळे देशांतर्गत उत्पादनक्षमता सुमारे १.५ एमएमटीएपर्यंत मर्यादित आहे.JS/ML/MS