पावसाळ्यापूर्वीच्या कामांना शिवसेनेकडून प्रारंभ ; मागाठाणे मतदारसंघातून सुरुवात
मुंबई, दि ६ :
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रभागि क्र.१२ च्या स्थानिक नगरसेविका सौ. सारिका शशिकांत झोरे यांच्या पुढाकाराने पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामांचा शुभारंभ शिवसेना विधानसभाप्रमुख श्री अशोक म्हामूणकर व उपविभागप्रमुख श्री चेतन कदम यांच्या शुभहस्ते मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून करण्यात आला.
याप्रसंगी मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य, विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, विधानसभा संघटक सौ रोहिणी चौगुले, उपविभागसंघटक सौ सिमिंतिनी नारकर, विधानसभा समन्वयक तुकाराम पालव, उपविधानसभा समन्वयक श्रीमती वैभवी तावडे, सौ शुभदा सावंत, शाखाप्रमुख सचिन मोरे, शाखा समन्वयक योगेश देसाई, महिला शाखासंघटक सौ माधुरी खानविलकर, शाखा समन्वयक सौ इतिश्री महाडिक, कार्यालयप्रमुख भास्कर सावंत, उपशाखाप्रमुख अनंत आंग्रे, अजित वाळंज, प्रतीक चव्हाण, दत्ताराम मोरे, सदा परब, सौ अनुराधा मोरे, सौ विनिता मडीये, सौ धनश्री चव्हाण, सौ सीमा सानप युवासेना शाखा समन्वयक सचिन शिरसाट, साईधाम सेवा समितीचे रत्नाकर गवस उपस्थित होते.JS/ML/MS