गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ हेमराज शाह यांच्या हाती पुन्हा एकदा सुकाणू

 गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ हेमराज शाह यांच्या हाती पुन्हा एकदा सुकाणू

मुंबई, दि ३: पडिले वळण इंद्रिया सकळा या उक्तीला अनुसरून गुजराती समाज चे संस्थापक अध्यक्ष डॉ हेमराज शाह यांनी वयाच्या ८६ व्या वर्षीही तरुणांना लाजवतील अशी कामगिरी केल्यामुळे ‘चैन पडेना आम्हाला’ या धर्तीवर पुनश्च एकदा गुजराती समाज चे सुकाणू हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुजराती समाज या संस्थेचा पाया भक्कम करुन या संस्थेला नावारूपाला आणले, सात मजली गुजराती भवन उभारुन एक मैलाचा दगड रचला. एका टर्मसाठी नागजीभाई रीटा यांना जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु ‘कर्मही मेरा धर्म हैं,’ या तत्त्वानुसार स्वस्थ बसणार नाही असा पण करीत २०२६ ते २०३० या कालावधीसाठी अर्थात चार वर्षांच्या मुदतीसाठी श्री बृहन्मुंबई गुजराती समाज, मुंबई च्या अध्यक्षपदाची धुरा तारक मेहता का उलटा चष्मा या अत्यंत लोकप्रिय मालिकेचे यशस्वी निर्माते दिग्दर्शक आसितभाई मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात शनिवार, ४ एप्रिल २०२६ रोजी स्वीकारणार आहेत. शनिवारी दुपारी ३.१५ वाजतां नवनीत गुजराती भवन, जोगेश्वरी येथे हा अभूतपूर्व पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *