AI डेटा केंद्रांमुळे वाढत आहे पृथ्वीचे तापमान

 AI डेटा केंद्रांमुळे वाढत आहे पृथ्वीचे तापमान

इंग्लंड, दि. १ : AI डेटा सेंटर्समुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, असे केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधनातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. संशोधनानुसार जिथे हे डेटा सेंटर्स कार्यरत आहेत, तिथे सरासरी 2 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले आहे. शास्त्रज्ञांनी याला ‘डेटा हीट आयलंड इफेक्ट’ असे नाव दिले आहे. संशोधकांनी मागील दोन दशकांतील सॅटेलाइट डेटाचे विश्लेषण केले. ज्या क्षणी एखाद्या परिसरात AI डेटा सेंटर कार्यान्वित होते, त्या क्षणी तेथील तापमान अचानक वाढते, असे दिसून आले. अभ्यासानुसार, जगभरात सुमारे 34.4 कोटी लोक अशा भागांमध्ये राहत आहेत, जे या डेटा सेंटर्सच्या उष्णतेच्या प्रभावाखाली आहेत. अनेक डेटा सेंटर्स शहरांपासून दूर बांधले गेले आहेत, तरीही त्यांचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत आहे.

डेटा सेंटरजवळ तापमान सरासरी 2.07 अंश सेल्सिअसने वाढले आहे. काही ठिकाणी वाढलेले तापमान 9.1 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. याचा परिणाम केवळ डेटा सेंटरच्या सीमेपर्यंत मर्यादित नाही. सेंटरपासून 10 किलोमीटरच्या परिसरातही तापमानात वाढ दिसून येत आहे.

एआय डेटा सेंटर्समधून बाहेर पडणारी अतिरिक्त उष्णता त्यांच्या आसपासच्या स्थानिक वातावरणाचे तापमान वाढवते. एआय मॉडेल्स चालवणारे शक्तिशाली सर्व्हर आणि कूलिंग सिस्टिम्स २४/७ गरम हवा बाहेर फेकतात, ज्यामुळे शहरी भागांमध्ये ‘हीट आयलंड’ तयार होतात.

यामुळे केवळ स्थानिक तापमान वाढत नाही, तर एआय सेंटर्स थंड ठेवण्यासाठी पाणी आणि विजेच्या वापरातही मोठी वाढ होते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, हे डिजिटल क्रांतीमुळे होणारे एक नवीन पर्यावरणीय थर्मल प्रदूषण आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *