प्रिमियम पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ
मुंबई, दि. १ : इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. Indian Oil Corsporation (IOCL) कडून प्रीमियम इंधनाच्या किंमतीत वाढ करण्यात आलीये. कंपनीने 100 ऑक्टोन पेट्रोल म्हणजेच XP100 पेट्रोलच्या किंमती वाढवल्या आहेत. दिल्लीत या किंमत 149 रुपयांनी वाढून 160 रुपये प्रति लिटर केल्या आहेत.
प्रीमियम डिझेल ‘एक्स्ट्रा ग्रीन’ही महाग झालं आहे. याची किंमत 91.49 रुपये होती. जी वाढून 92.99 रुपये प्रति लिटर झाली आहे. हे नवीन दर IOCL च्या सर्व आउटलेट्सवर लागू करण्यात आलेय. सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या स्थिर आहेत. इंडियन ऑइल कॉपरेशनने आतापर्यंत प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याचं स्पष्ट कारण सांगितलं नाही. पण ग्लोबल मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार आणि अमेरिका-इराण युद्धामुळे वाढलेल्या लॉजिस्टिक्स खर्चामुळे या किंमती वाढलेल्या असू शकतात.
आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार असुनही भारत सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही. सरकारने सांगितल्यानुसार, तेल कंपन्या कंपन्यांमध्ये होणाऱ्या बदलाचा काही भाग स्वतः मॅनेज करत आहेत. जेणेकरुन ग्राहकांना अचानक किंमती वाढल्याचा धक्का बसू नये.
SL/ML/SL