माजी आमदार मधु चव्हाण यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

 माजी आमदार मधु चव्हाण यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

मुंबई, दि १
म्हाडाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार मधु चव्हाण यांचा वाढदिवस नुकताच भायखळा येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात नुकताच जल्लोषात संपन्न झाला. चव्हाण यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात अनेक सामाजिक आणि लोकोपयोगी कामे केली आहेत. तसेच ते आता आमदार नसून देखील ते दररोज सकाळ आणि संध्याकाळी आपल्या जनसंपर्क कार्यालयात येऊन लोकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवत असतात. ते कधी कोणताही भेदभाव करत नाहीत. त्यामुळे त्यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी मुंबई प्रदेश सहकार सेलचे अध्यक्ष यशवंत (भाई) सावंत सोबत सहकार सेल उपाध्यक्ष साहेबराव देशमुख, मुंबई प्रदेश काँग्रेस सचिव हेमंत दळवी, उपाध्यक्ष केनेथ मिस्किटा, प्रशासकीय सचिव श्रीनिवास देवरुखकर, उपाध्यक्ष्य दिलीप खान्देशी, सरचिटणीस रविंद्र निकाळे, पत्रकार केतन खेडेकर आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *