मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करा.
मनसे ने दिले पोलीस स्टेशनला पत्र

 मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करा.मनसे ने दिले पोलीस स्टेशनला पत्र

मुंबई, दि ३०
मंत्री मंगलप्रभात लोढा है घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी दिनेश पुंडे यांनी सरदार वल्लभाई पटेल या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करावा याबाबत पत्र दिले.
समाजमाध्यमांवर मंगलप्रभात लोढा ह्यांनी जैन समुदायाला बेकायदेशीर गैस सिलेंडर दिल्याचे पत्र फिरत आहे. तसेच त्यांनी जैन सोसायटयाना आवाहन केले आहे की सिलेंडर हवे असल्यास त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
नियमांना डावलून फक्त जैन समाजाला गॅस सिलेंडर उपलब्ध करून देऊन इतर सामान्य लोकांच्या अधिकाराचे उल्लंघन केले असून त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना घटनेचे देखील उल्लंघन केले आहे. तसेच एका विशिष्ट समाजाप्रती त्यांनी आकस बाळगल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते.

तसेच त्यांनी जैन समुदायाला बेकायदेशीर मार्गाने गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिल्याचे पत्र आमच्याकडे आहे. मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या या गैकृतीबद्दल आम्ही गिरगावकर टीमने देखील निषेध नोंदवला आहे. गॅस सिलेंडर चा काळाबाजार करत असल्याने आमदार मंगलप्रभात लोढा यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनेश पुंडे यांनी केली.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *