बेरड, बेडर, रामोशी समाज नोकरदार परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 बेरड, बेडर, रामोशी समाज नोकरदार परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि ३०
बेडर, बेरड, रामोशी समाज नोकरदार परिषद नुकतीच दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे संपन्न झाली. या परिषदेला समाज बांधवांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश नाईक व मान्यवरांच्या हस्ते शिव भक्त महान संत बेडर कन्नपा, शिवनेत्र बहिर्जी नाईक, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, प्रेरणास्थान स्वर्गीय कै. श्री. भीमराव गस्ती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. सुरेश दत्तात्रय नाईक (उपसचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय) यांच्या अध्यक्षतेखाली ही पाचवी परिषद मुंबईत पार पडली.
आणि या परिषदेचा उच्चशिक्षित व उच्च पदस्थ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
सन्मानमूर्ती
श विलास नाईक चंदगड पंचायत समिती सभापती,
कैलास टोकले एपीआय मीरा भाईंदर स्वाती संभाजी मदने पंचायत समिती सदस्य किल्ले मच्छीद्रगड,
कु मयुरी मऱ्यापा तळवार उच्च न्यायालयात लिपिक, योगिता शहाजी मलमे मंडले सह कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई,
अनिकेत महादेव नाईक पी एस आय मुंबई, सचिन बाळगोंडा पाटील पी एस आय मुंबई,
कु नूतन सदाशिव नाईक स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम विभाग.
बसवराज नाईक टॅक्स असिस्टंट कोल्हापूर, संभाजी लक्ष्मण लिंगले लेखक व साहित्यिक गोल्ड मेडलिस्ट, सूरज मदने लेखक साहित्यिक, डॉ विशाल नाईक बी एच एम एस डॉक्टर या सर्व सन्मान मूर्तीचा सन्मान शाल पुष्प व गुप्तहेर प्रमुख राजे बहिर्जी व आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या कार्यावर आधारित लेखक सूरज मदने लिखित पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
सर्व सन्मानमूर्ती यांनी समाजाचा सन्मान पुरस्कार मिळाल्याने आनंद व समाधान व्यक्त केलं व या पुढे समाजासाठी परिषदे सोबत मिळून कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली व आयोजकांचे आभार मानले.
प्रमुख मार्गदर्शक श्री अनिल गुजले इतिहास तज्ञ यांनी समाजाचा इतिहास समाजाचे महापुरुष व त्यांचे महान कार्य समाज बांधवांसमोर मांडले ज्या मध्ये राजा कृष्णदेव राय पासून ते राजे उमाजी नाईक यांच्या कार्याची माहिती दिली.आजच्या पिढीला हा इतिहास माहीत नाही जर आपण आपल्या समाजाचा इतिहास आपल्या नवं पिढी समोर मांडला तर एक आदर्श समाज आपण निर्माण करू असे मत त्यांनी मांडले.या कार्यक्रमाचे आयोजन कांचन नाईक जांबोटी, संतोष पाटील , मारुती अलदाळे , मार्गदर्शक मधुकर मंमाळे , कॅप्टन अर्जुन लिंगले, राजाभाऊ चव्हाण, शंकर जाधव , जयवंत शिरतर , समाधान वाघमोडे , यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *