बेस्ट कामगारांच्या प्रश्नांवर लवकर तोडगा निघेल, कामगार नेते गजानन नागे
मुंबई, दि २९
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात नुकतीच मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे निर्णायक बैठक संपन्न झाली.
या बैठकीचे आयोजन माननीय महापौर रितू तावडे आणि सभागृह नेते गणेश खणकर यांनी केले होते.
भाजपा बेस्ट कामगार संघाने सन २०२१ पासून ते आतापर्यंत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. बैठकीदरम्यान संघाने गेल्या ५ वर्षांतील एकूण ३१ छायांकित प्रतींचा (Photos/Documents) संच माननीय महापौरांना सुपुर्द केला. यामध्ये वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, महापालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनांचा आणि केलेल्या पत्रव्यवहाराचा संपूर्ण गोषवारा समाविष्ट आहे. संघाच्या या चिकाटीमुळेच आज प्रशासनाला सकारात्मक पाऊल उचलावे लागले.बैठकीत महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महाव्यवस्थापक अश्विनी जोशी यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि व्यवस्थापन अधिक सशक्त करण्यासाठी आगामी उच्चस्तरीय बैठकांमध्ये त्वरित सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
कामगारांच्या हितासाठी पुढाकार घेतल्याबद्दल भाजपा बेस्ट कामगार संघ माननीय महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर आणि सर्व उपस्थित मान्यवरांचे भाजपा बेस्ट कामगार संघ मनःपूर्वक आभार व्यक्त करत असल्याची माहिती संघाचे सरचिटणीस गजानन नागे यांनी दिली.
या बैठकीत बृहनमुंबई महानगरपालिका उपमहापौर संजय घाडी, गणेश खणकर – सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेनेचे गटनेते
अमेय घोले, भाजपा बेस्ट कामगार संघाचे उपाध्यक्षbआनंदा जरग,
चिटणीस संतोष काटकर आणि बेस्ट कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.JS/ML/MS