युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्पनी इराणसमोर ठेवल्या १५ अटी
तेल अविव, दि. २५ : इराणविरोधात अमेरिका आणि इस्राइलने पुकारलेल्या युद्धाला आता महिना होत आला आहे. इराणविरोधात मध्यपूर्वेतील अन्य मुस्लीम देशही एकवटले आहेत. तरीही इराण मागे हटण्याची चिन्हे दिसत नाहीत. या युद्धामुळे जगातील अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे जागतीक अर्थव्यवस्थेवर ताण आला आहे. दरम्यान आता इस्रायलच्या ‘चॅनल १२’च्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणसमोर सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी १५ कलमी प्रस्ताव ठेवला आहे. एका अमेरिकी अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली असून, वॉशिंग्टनने या चर्चांची माहिती इस्रायललाही दिल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, इस्रायलला चिंता आहे की, ट्रम्प प्रशासन या अटी अनिवार्य करण्याऐवजी “फ्रेमवर्क करार” करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. व्हाइट हाऊसचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे निकटवर्तीय जॅरेड कुशनर यांनी एक यंत्रणा तयार केल्याचे सांगितले जाते. यामध्ये एक महिन्याच्या युद्धविरामाची घोषणा करून त्या कालावधीत १५ कलमी प्रस्तावावर चर्चा करण्याचा विचार आहे.
इराणसमोर अमेरिकेने ठेवलेल्या प्रमुख अटी
इराणने आपली अणु क्षमता पूर्णपणे नष्ट करावी.
अण्वस्त्र कार्यक्रम न राबवण्याची कायमची हमी द्यावी.
युरेनियम समृद्धीकरण पूर्णपणे थांबवावे.
६०% समृद्ध केलेले सुमारे ४५० किलो युरेनियम आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेकडे (IAEA) सुपूर्द करावे.
नतांझ, इस्फहान आणि फोर्डो येथील अणु प्रकल्प बंद करावेत.
IAEAला पूर्ण तपासणी व देखरेखीचा अधिकार द्यावा.
प्रादेशिक ‘प्रॉक्स’ धोरणाचा त्याग करावा.
प्रॉक्सी गटांना निधी, शस्त्रसाठा आणि मदत थांबवावी.
होर्मूज सामुद्रधुनी खुली ठेवावी.
क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालावी.
भविष्यातील क्षेपणास्त्र वापर फक्त स्वसंरक्षणापुरता मर्यादित ठेवावा.
SL/ML/SL