सायन येथील निसर्ग एस आर ए गृहनिर्माण संस्था आंदोलनाचा पवित्रा

 सायन येथील निसर्ग एस आर ए गृहनिर्माण संस्था आंदोलनाचा पवित्रा

मुंबई, दि २३: सरकारने एस आर ए योजनेतून आम्हाला विकासकाच्या माध्यमातून घराचे स्वप्न दाखवले.
आज १८ वर्ष झाली. बिल्डर आणि सरकारी बाबूंनी आम्हाला या स्वप्नातील घरापासून दूर ठेवले आहे. त्यामुळे आता आमचा अंत सरकारने बघू नये अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा निसर्ग

एस आर गृहनिर्माण संस्थाचे माजी मुख्य प्रवर्तक जोसेफ शांतीमानव यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

सायन कोळीवाडा येथे आमची हक्काची घरे होती. गगनचुंबी इमारती मध्ये स्वप्नातील घर मिळेल यासाठी एस आर ए चे सरकारी बाबू जे सांगतील ते कागदपत्र आम्ही दिले. आमची हक्काची घरे बिल्डर ने तोडली व

गेल्या १८ वर्षापासूनच आमचा वनवास सुरू केला. भाडे दिले ते बंद अवस्थेत, टी डी आर साठी बिल्डर ने मंत्रालयातून स्वतःचे भले करून घेतले. करोडो रुपये या गगनचुंबी इमारतीमधुन बिल्डर कमवत असताना आम्हाला पत्रकार परिषद घेऊन न्याय मागावा लागत आहे. असे मोहन गुप्ता, गणेश बैजनकी, कैलास मेद, राजेश देवेंद्र यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *