महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी योगेश सोमण
पुणे दि १६ : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळाचे साहित्य संवर्धन आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवून सत्ताधारी परिवर्तन उत्कर्ष पॅनलचा पराभव केला. साहित्य परिषदेच्या तीन प्रमुख पदांवर साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण (अध्यक्ष), स्वाती महाळंक (प्रमुख कार्यवाह) आणि प्रदीप निफाडकर ( कोषाध्यक्ष) यांनी विजय मिळवला. शहर कार्यवाहपदाच्या निवडणुकीत सातपैकी चार जागांवर साहित्य संवर्धन आघाडीने विजय मिळवला.
साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उत्कर्ष परिवर्तन आणि साहित्य संवर्धन या दोन आघाड्यांमध्ये चुरस होती. साहित्य परिषदेच्या (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल रविवारी रात्री उशिरा जाहीर झाला. ‘अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण (५,३६५) आणि प्रा. मिलिंद जोशी (५,३२०), प्रमुख कार्यवाहपदाच्या उमेदवार स्वाती महाळंक (५,४१४) आणि सुनीताराजे पवार (५,२८५) तसेच कोषाध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर (५,५३६) आणि विनोद कुलकर्णी (५, १६८) यांना अशी मते मिळाली,’ अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी प्रताप परदेशी, सहअधिकारी संजीव खडके आणि गिरीश केमकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.ML/ML/MS